Mumbai, जानेवारी 26 -- Weather News: महाराष्ट्रातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुढील पाच दिवस थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसचे नागरिकांनी aया काळात आपल्या आरोग्याची काळजी करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात येत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य भारतात सध्या थंडीला पोषक वातावरण तयार झाले आहे. येत्या काही दिवसांत किमान राज्यातील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा गारठ्याचा सामना करावा लागणार आहे. राज्यात पुढील पाच दिवस कोरडे व शुष्क वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार असल्याने थंडी वाढण्याची शक्यता आहे.

दक्षिणेकडील नैऋत्य मौसमी पावसाचं वातावरण...