Mumbai, मार्च 8 -- Weather Updates: राज्याच्या हवामानात गेल्या पंधरा दिवसांत वेगाने बदल झाल्याचे दिसून आले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे किमान तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळाले.मात्र, आता पुन्हा कमाल तापमानात वेगाने वाढ होऊ लागली आहे. राज्यात अनेक भागात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.

राज्यातील काही शहरांमध्ये रात्री गारवा आणि दुपारी ऊन अशी परिस्थिती जाणवत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी ८ मार्च रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये किमान आणि कमाल तापमानाची स्थिती काय असू शकते? हे जाणून घेऊयात.

ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिम विदर्भापासून कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून राज्यातील अनेक भागात आज कमाल तापमानात वाढ होण्याची श...