Mumbai, जानेवारी 28 -- Waqf Amendment Bill News: वक्फ दुरुस्ती विधेयकाला संयुक्त संसदीय समिती म्हणजेच जेपीसीने मंजुरी दिली आहे. त्यात १४ बदल करण्यात आले आहेत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल सभागृहात मांडण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजपच्या जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर एकूण ४४ बदल प्रस्तावित करण्यात आले होते, त्यापैकी अनेक बदल विरोधी खासदारांनीही मांडले होते, परंतु प्रस्तावित बदल विरोधकांनी मतदानाद्वारे फेटाळून लावले. दरम्यान, जुना कायद्यात नेमका काय बदल करण्यात आला? याबाबत जाणून घेऊयात

वक्फ दुरुस्ती विधेयकाचा अभ्यास करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीने सोमवारी भाजपप्रणित एनडीए सदस्यांनी सुचविलेल्या सर्व सुधारणा मान्य केल्या आणि विरोधी सदस्यांनी केलेल्या सर्व सुधारणा फेटाळून लावल्या. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना समितीच...