New delhi, जानेवारी 27 -- Waqfamendmentbill JPC : वक्फ दुरुस्ती विधेयकाला संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) मंजुरी दिली आहे. त्यात १४ बदल करण्यात आले आहेत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल सभागृहात मांडण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजपच्या जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर एकूण ४४ बदल प्रस्तावित करण्यात आले होते, त्यापैकी अनेक बदल विरोधी खासदारांनीही मांडले होते, परंतु प्रस्तावित बदल मतदानाद्वारे विरोधकांचे प्रस्ताव फेटाळून लावले.

वक्फ दुरुस्ती विधेयकाचा अभ्यास करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) सोमवारी भाजपप्रणित एनडीए सदस्यांनी सुचविलेल्या सर्व सुधारणा मान्य केल्या आणि विरोधी सदस्यांनी केलेल्या सर्व सुधारणा फेटाळून लावल्या. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल म्हणाले की, समितीने स्वीकारलेल्या ...