Mumbai, जानेवारी 30 -- Energy Stock News : वारी एनर्जीज लिमिटेडनं गुरुवार, ३० जानेवारी रोजी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. डिसेंबर तिमाहीत कंपनीनं मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत चार पटीहून अधिक नफा कमावला आहे.

डिसेंबर तिमाहीत कंपनीला ४९३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो १२४.५ कोटी रुपये होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल ११६ टक्क्यांनी वाढून ३,४५७ कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी ही रक्कम १,५९६ कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. वारी एनर्जीजकडं २६.५ गिगावॅटची ऑर्डर्स आहेत. या ऑर्डर्सची किंमत आजच्या घडीला ५०,००० कोटी रुपये आहे.

वारी एनर्जीजचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पैठणकर यांनी तिमाही निकालाबद्दल आनंद व्यक्त केला. 'ऊर्जा संक्रमण कंपनी म्हणून आम्हाला अफाट संधी दिसत आहेत....