Mumbai, फेब्रुवारी 10 -- Vishwakarma Jayanti Shubhechha : दरवर्षी, विश्वकर्मा जयंती आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्वाने साजरी केली जाते. विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. भगवान विश्वकर्मा हे विश्वाचे पहिले शिल्पकार किंवा अभियंता मानले जातात. हिंदू कॅलेंडरनुसार, हा शुभ प्रसंग माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तेराव्या दिवशी (माघ शुक्ल पक्ष त्रयोदशी) येतो. या वर्षी, विश्वकर्मा जयंती सोमवार १० फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा केला जात आहे.

विश्वकर्मा यांची पूजा केली जाते, स्मरण केले जाते. या दिवशी उपलब्ध सर्व शस्त्रांची, दररोज उपायोगात येणारी यंत्रे, तंत्रे यांचे पूजन केले जाते कलियुगात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण लॅपटॉप, मोबाइल आणि टॅबलेट अगदी दररोज वापरतो. ही देखील यंत्रे आणि शस्त्र आहे. त्यामुळे या यंत्र...