Mumbai, एप्रिल 11 -- Virat Kohli Angry Reaction Rajat Patidar : आयपीएल २०२५ मध्ये गुरुवारी (११ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला गेला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीला दारुण पराभव पत्करावा लागला.

दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ विकेट्सने पराभव केला. बंगळुरू १६४ धावांच्या लक्ष्याचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यांच्या गोलंदाजांनी दिल्लीची टॉप ऑर्डर उद्धवस्त करून दमदार सुरुवातही केली होती.

पण दिल्ललीच्या केएल राहुलची ९३ धावांची नाबाद खेळी आरसीबी संघासाठी खूपच वेदनादायी ठरली. केएल राहुलने एकहाती संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, आरसीबीच्या या पराभवानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विराट कोहली संघाचा मेंटॉर दिनेश कार्तिक याच्याशी संतापच्या ...