New Delhi, मे 12 -- अनुभवी फलंदाज विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मानेही कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता आणि आता विराट कोहलीनेही लाल चेंडूच्या क्रिकेटमधून निवृत्ती अधिकृतपणे जाहीर केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर कसोटी निवृत्तीची घोषणा केली. विराट आणि रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ही एकत्र निवृत्ती घेतली होती. विराटने आपल्या इन्स्टावर - २६९ साईनिंग ऑफ लिहिले आहे. २६९ हा त्याचा कसोटी कॅप क्रमांक आहे. तो यापुढे इंग्लंड दौऱ्यावर जाणार नाही.

निवृत्तीची घोषणा करताना विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर लिहिले की, "कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅगी ब्लू परिधान करून १४ वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर हा फॉर्मेट मला कोणत्या प्रवासाला घेऊन जाईल याचा मी कधीच विचार केला नव्हता....