Mumbai, फेब्रुवारी 6 -- Loveyapa Screening Viral Video : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. आमिरपाठोपाठ आता त्याचा मुलगा जुनैद खानही वडिलांच्या वाटेवर चालला आहे. 'महाराज'नंतर जुनैद आता त्याच्या 'लव्हयापा' या दुसऱ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर 'लव्हयापा'मध्ये जुनैदसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून 'लव्हयापा'चे स्क्रिनिंग सुरू आहे. जुनैद आणि खुशीचा चित्रपट पाहण्यासाठी बॉलिवूडचे सर्व स्टार्स पोहोचले होते, पण बॉलिवूडचे दोन खान अवतरले तेव्हा सर्वांच्या नजरा खिळल्या.

आमिरच्या मुलाच्या 'लव्हयापा' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला शाहरुख खान आणि सलमान खान उपस्थित होते. यामुळे सर्वांच्या नजरा सलमानच्या जीन्सकडे गेल्या. ...