Mumbai, फेब्रुवारी 10 -- Salman Khan Viral Video : सध्याची तरुण पिढी ही इतकी सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आहे की, आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ती या माध्यमातून व्यक्त करते.सोशल मीडिया हा अन्न, वस्त्र आणि निवारा यानंतरचा आवश्यक घटक बनू लागला आहे. या माध्यमाचा लोकांवर इतका प्रभाव आहे की, आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी या माध्यमातून पडताळून पहिल्या जातात आणि इथे दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लोक सहज विश्वास ठेवतात. याचीच संधी साधून आता अनेक लोक स्वयंघोषित मोटीव्हेशनल स्पीकर बनले असून, यामुळे अनेकांवर चुकीचा प्रभाव देखील पडत आहे. आता बॉलिवूडचा 'दबंग' अर्थात अभिनेता सलमान खान याने अशा लोकांचे चांगलेच कान टोचले आहेत. सलमान खानने तरुणाईला देखील मोलाचा सल्ला दिला आहे.

सलमान खान हा त्याच्या बिनधास्त बोलांमुळे चांगलाच लोकप्रिय आहे. सलमान अनेकदा त्...