Mumbai, जानेवारी 31 -- Aamir Khan Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती फाटक्या आणि विचित्र कपड्यांमध्ये रस्त्यांवर फिरताना दिसला आहे. त्याची अवस्था पाहता ही व्यक्ती शुद्धीतच नाही, असे वाटत होते. त्याचे स्वरूपही खूप विचित्र दिसत होते. जणू काही आदिमानवच रस्त्यावर फिरत आहे, असे वाटत होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रस्त्यावर विचित्र अवस्थेत फिरणारी ही व्यक्ती बॉलिवूडचा एक मोठा सुपरस्टार आहे. या व्यक्तीला बघून तुम्हाला ओळख पटली का?

तुम्ही कदाचित या व्यक्तीला अजूनही ओळखले नसेल. या आदिमानवाप्रमाणे रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीचे नाव जरी आम्ही तुम्हाला सांगितले तरी तुमचा विश्वास बसणार नाही. खरं तर, ही व्यक्ती दुसरी कोणी नसून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान आहे. या व्हिडिओम...