Mumbai, फेब्रुवारी 1 -- Udit Narayan Viral Kiss Video : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण हे इंडस्ट्रीतील दिग्गज गायकांपैकी एक आहेत. उदित यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तम गाणी दिली आहेत, जी प्रेक्षकांना आणि चाहत्यांना खूप आवडतात. मात्र, आता उदित नारायण यांचा नवा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्यांना खूप ट्रोल केले जात आहे. इतकंच नाही तर, हा व्हिडिओ पाहून चाहते चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, उदित नारायण 'टिप-टिप बरसा पाणी' या गाण्यावर परफॉर्म करत आहे आणि तितक्यात अनेक महिला फॅन्स स्टेजजवळ येऊन त्यांच्यासोबत फोटो क्लिक करतात. यावेळी एक चाहती तिथे येऊन फोटो काढत असते आणि त्यावेळी गायक उदित नारायण तिला किस करतात. त्याचवेळी जेव्हा ही चाहती त्यांना गालावर किस करायला...