Chandigarh, मे 16 -- diesel paratha chandigarh viral video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की चंदीगडमधील एका रेस्टॉरंटमध्ये पराठे शिजवण्यासाठी डिझेल वापरले जात आहे. ऐवढेच नाही तर व्हिडिओ तयार करणाऱ्या ब्लॉगरने रोज ३०० लोक हा डिझेल पराठा आवडीने खात असल्याचा दावा देखील केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडीओवरुन बराच गदारोळ सुरु झाला आहे. तीन मिनिटांच्या या व्हिडिओची सुरुवात एका रेस्टॉरंटमध्ये एका माणसाने पीठ मळून त्यात बटाट्याचे मिश्रण भरून केली. यावेळी व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने त्याला विचारले की तू काय बनवत आहेस, तर त्याने 'डिझेल पराठा' बनवत असल्याचे सांगितले.

चंदीगड येथील एका हॉटेलमधील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पराठा तयार करणाऱ्याने पराठा थापून तव्यावर टाकला. यानं...