भारत, डिसेंबर 6 -- बुरहानपूर : बकरी एवजी बोकड दूध देतो असे म्हटले तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला मूर्ख ठरवणार. तसेच असे वक्तव्य केल्याने तुम्ही त्याची टर्र देखील उडवणार. पण, हे खरे आहे असे सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. हो, मध्यप्रदेशात बुरहानपूर येथे एका गोट फार्ममध्ये चक्क बोकड दूध देतांना दिसत असून याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. मूळचा मध्यप्रदेशांतील आणि महाराष्ट्रात पशूसंवर्धनचे शिक्षण घेतले असलेल्या तुषार निमाडे याचा हा गोट फार्म असून त्याच्या फार्म मधील बोकड दूध देत असल्याने हे पाहण्यासाठी आजू बाजूच्या गावातील नागरिक येत आहेत.

तुषार निमाडे पूर्वी नाशिकमध्ये एका कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता. या ठिकाणी त्याला पशुवैद्यकीय डॉक्टर भेटले. त्याच्याकडून प्रेरणा घेत, त्याने पशुवैद्यकीय डॉक्टरचा कोर्स करत स्वत: शेळी पालन करण्य...