Mumbai, जानेवारी 27 -- Grandmother Dance On Pushpa 2 Song Viral Video : 'पुष्पा २ द रूल' या चित्रपटातील 'अंगारों' या व्हायरल गाण्यावर एक व्यक्ती आणि त्याची आजी यांचा धमाल डान्स करतानाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ नेटकऱ्यांची मने जिकून घेत आहे. संकेत डवलकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या क्लिपमध्ये हा एक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला आहे. या आजीबाई 'पुष्पा २' या चित्रपटात श्रीवल्ली ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रश्मिका मंदानाच्या आयकॉनिक डान्स स्टेप्स अगदी आपल्या अंदाजात सहजपणे करताना दिसल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये संकेतची आजी 'अंगारों' गाण्याच्या तालावर मनमोकळेपणाने थिरकताना दिसत आहे. हा व्हिडिओ सुरू होताच नातू संकेत देखील आजीसोबत या डान्समध्ये सामील होतो आणि दोघंही आपल्या सिंक्रोनाइज्ड डान्स परफॉर्मन्सने सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आणल...