Delhi, फेब्रुवारी 10 -- Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा प्राणिसंग्रहालयात असल्याचं दिसत आहे. हा मुलगा एका वाघाच्या तिथे पिंजऱ्या जवळ असून पिंजऱ्यातील वाघाने त्या मुलाचा शर्ट तोंडात पकडला आहे. हे दृश्य भयंकर दिसत असून मुलगा वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी वाघाला विनवणी करतांना दिसत आहे. तो मदतीसाठी ओरडत असून यावेळी तो वाघाला त्याचा शर्ट सोडण्याची विनवणी करतांना त्याने शर्ट फाडला तर त्याची आई त्याला मारेल, त्यामुळे प्लीज शर्ट सोड असं म्हणताना तो दिसत आहे. या मुलाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

सोडण्यासाठी थेट वाघालाचं विनंती

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मुलगा खूप ओरडत व रडतांना दिसत आहे. तो वाघाला त...