Mumbai, जानेवारी 27 -- Mumbai Viral News: मुंबईच्या एका व्यक्तीने इन्स्टाग्रामवर स्विगीवर सूचीबद्ध फ्रेशमेनू रेस्टॉरंटच्या स्वच्छतेची धक्कादायक स्थिती उघड केली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने पनीर बर्गर मागवला होता, पण त्याऐवजी चिकन बर्गर मिळाले. त्याने सांताक्रूझ पूर्वेकडील कलिना येथील रेस्टॉरंटमध्ये जाऊन चौकशी केली असता तेथील स्वच्छता पाहून ग्राहकाला मोठा धक्का बसला. त्याने संबंधित रेस्टॉरंटचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीवरून दररोज लाखो लोक जेवण ऑर्डर करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून स्विगीवरून चुकीच्या ऑर्डर मिळत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. दरम्यान, नुकताच स्विगीच्या एका ग्राहकाने सोशल मीडियावर आपला धक्कादाय...