Mumbai, फेब्रुवारी 10 -- Viral News: शाळेच्या मुख्याधापकाने शिक्षकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुख्याधापकाने शिक्षकाला मारहाण का केली? यामागचे खरे कारण समजू शकले नाहीत. परंतु, विद्यार्थ्यांना शिकवण्यावरून वाद झाल्याने भांडण पेटल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

गुजरातमधील भरूच येथील नवयुग शाळेत ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हितेंद्र सिंह ठाकोर असे मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. तर, राजेंद्र परमार असे शिक्षकाचे नाव आहे. वृत्तानुसार, गणित आणि विज्ञान वर्गात शिकवण्याबाबत शिक्षक परमार यांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. यादरम्यान, दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर हा ...