Mumbai, फेब्रुवारी 7 -- Kumbh Mela 2025: प्रयागराजमधील महाकुंभात आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी हजेरी लावली आहे. महाकुंभात भाविकांची गर्दी होत असल्याने भाविकांची गर्दी आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचपार्श्वभूमीवर एका तरुणीने महाकुंभात पोहचण्यासाठी रेल्वेच्या शौचालयात उभी राहून प्रवास केला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, अनेकांना तरुणीचे असे कृत्य पटले नसून या व्हिडिओवर त्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणी आपल्या दोन मित्रांसह रेल्वेच्या शौचालयात उभी असल्याचे दिसत आहे. तरुणीने स्वत: हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ काढत असताना तरुणीने बोलत आहे की, 'मित्रांनो,आम्ही रेल्वेच्या शौचालयात आहोत आणि कुंभमेळ्याला जात आहोत.'

या तरुणीने असा दावा केला ...