Mumbai, फेब्रुवारी 6 -- Viral News: मध्य प्रदेशातील देवास येथील एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुणांनी धुमडक्यात एका भटक्या कुत्र्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. या कुत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तरुणांनी चौकात भलेमोठे होर्डिंग्ज लावले आहेत. कुत्र्याचा वाढदिवसाचा व्हिडिओ अनेकांना आवडला असून यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

डिजिटल कंटेंट क्रिएटर अंशु चौहान यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये आमचा निष्ठावंत लूडोला त्याच्या वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा, असे लिहिलेले दिसत आहे. या होर्डिंग्जमध्ये नागरिकांना आणखी एक मेसेज देण्यात आला आहे. आपल्या भारतीयाचा अभिमान बाळगा, देशी कुत्रेच दत्तक घ्या.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत काही तरुण जीपमधून शहरात फिरवताना दिसत आहेत. कुत्र्याच्या...