Mumbai, जानेवारी 30 -- Mumbai News: मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावरील स्कायवॉकवर एका तरुणाने भटक्या कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. स्कायवॉकवरून जाणाऱ्या एका व्यक्तीने संबंधित तरुणाचे क्रूर कृत्य आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींनी संबंधित तरुणाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकवर संबंधित तरुण भटक्या कुत्र्यावर बलात्कार करत असल्याचे एका व्यक्तीच्या लक्षात येते. त्यानंतर ही व्यक्ती किळसवाणा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते. या व्यक्तीने तरुणाला तू काय करत आहेत? असा प्रश्न विचारत आहे. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जातो. व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व...