भारत, जानेवारी 27 -- Viral News: महाकुंभ २०२५ मध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. मौनी अमावास्येला महाकुंभात १० कोटी लोक स्नान करतील, असा अंदाज आहे. तर, २५ आणि २६ जानेवारीला मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले. मौनी अमावस्येमुळे महाकुंभात गर्दी वाढू लागल्याने प्रत्येकजण आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेत आहेत. अशातच महाकुंभातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेने आपल्या पतीला हरवू नये म्हणून भन्नाट आयडिया लढवली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

रासगनियासरजीत नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'महाकुभात तुमच्या जोडीदाराला असेच बांधून ठेवा.' या व्हिडिओत महिलेने आपल्या पतीला ...