Mumbai, फेब्रुवारी 11 -- Viral News: प्रवासी महिलेला बॉयफ्रेन्डसोबत किती वेळा सेक्स केला? असा प्रश्न विचारणाऱ्या कॅब चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पीडित महिलेने कॅब चालक बोलत असतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ही घटना दुबईत घडली.

naima.nsa या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओत कॅब चालक महिलेला तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत किती वेळा सेक्स केला आहे? असा प्रश्न विचारत आहे. त्यानंतर कॅब चालकाने तिला ती सध्या कोणत्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंधात आहे, असे बोलतो. पुढे कॅब चालकाने सर्व मर्यादाच ओलांडल्या. त्याने महिलेला ...