भारत, नोव्हेंबर 30 -- बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर नुकतेच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल १५ मध्ये पाहुणे म्हणून आले होते. ते त्यांचा आगामी सिनेमा वनवासच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये पोहोचले होते. दरम्यान, नाना पाटेकर यांनी इंडियन आयडॉलमधील एका स्पर्धकाला विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा प्रश्न ऐकून शोचे परीक्षक देखील चकीत झाले आहेत.

सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनने शनिवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर इंडियन आयडॉलचा एक नवीन प्रोमो शेअर केला. यात नाना पाटेकर हे स्पर्धक मिस्केम्मे बोसूसोबत गप्पा मारताना दिसला. नाना पाटेकर यांनी मायस्केमला विचारले, "तुमचा अंकशास्त्रावर विश्वास आहे का?" त्यावर मायस्केमने हो असे उत्तर दिले. त्यानंतर नानांनी तिला स्पर्धा कोण जिंकणार असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून मिस...