Mumbai, फेब्रुवारी 13 -- Nashik Viral News: नाशिकमध्ये लेट नाईट पार्टीवरून परतणाऱ्या मद्यधुंद तरुणीने भररस्त्यात पोलिसांनी वाद घातला. पोलीसांशी हुज्जत घालणार्‍या या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित तरुणी मित्रासह दारू पिऊन दुचाकीवरून जात असल्याचा पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी गंगापूर रोडवर येथे त्यांची दुचाकी थांबवून विचारपूस केली असता तरुणीने त्यांच्याशी हुज्जत घातली. ही घटना १० फेब्रुवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास घडली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहे. तर, व्हिडिओ रेकॉर्ड काढणाऱ्या व्यक्तीला ती व्हिडिओ का काढत आहे? अशी विचारणा करते. यावर व्हिडिओ काढणारा व्यक्ती तिला उद्धटपणे उत्तर देते. पुढे तरुणी मद्यधुंद अवस्थेत तिच...