Madhya Pradesh, एप्रिल 15 -- Prayagraj Railway Station Viral Video: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या एका अधिकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे एका वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला आहे. वृद्ध व्यक्ती अन्न खरेदी करण्यासाठी प्रयागराज जंक्शनवर उतरला. मात्र, ट्रेन सुरु झाल्याने वृद्ध व्यक्तीने पुन्हा रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचा पाय घसरला. परंतु, घटनास्थळी उपस्थित असलेल्या रेल्वे अधिकाऱ्याने त्यांना पडण्यापासून वाचवले.

सज्जन कुमार (वय, ६३) असे वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. सज्जन कुमार हे गुवाहाटी- बिकानेर ट्रेन (क्र. १५६३४) सकाळी ११.१८ वाजता प्रयागराज स्थानकावर पोहोचली. ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर ट्रेनने सकाळी ११.३५ च्या सुमारास स्टेशन सोडले. हे सज्जन कुमार यांनी पाहिले. यानंतर संज्जन कुमार यांनी धावत्या ट्रेनमध्...