Mumbai, फेब्रुवारी 13 -- Viral News: गाडी चालवताना लॅपटॉपवर काम करणाऱ्या महिलेला पोलिसांनी दंड ठोठावल्याचा प्रकार समोर आला. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या महिलेला पोलिसांनी अशा बेदरकार वागणुकीबद्दल कडक इशारा देखील दिला आहे. हा प्रकार नेमका कधी घडला? याबाबात कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्ना प्रतिक्रिया येत आहेत.

बेंगळुरूच्या ट्रॅफिक नॉर्थचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात महिला रस्त्यावरून जाताना स्टिअरिंग व्हीलवर आपला लॅपटॉप ठेऊन काम करताना दिसत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महिलेला दंड ठोठावण्यात आल्याचा फोटोही पोलिसांनी पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ड्रायव्हिंग करताना कारमधून नव्हेतर घरून काम करा, असे लिहिले आहे.

या व्हिडिओ...