Mumbai, जानेवारी 28 -- Who Is Kinza Hashmi : काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री किंझा हाश्मी आणि 'बिग बॉस १७'चा विजेता मुनव्वर फारुकी यांच्या काहींनी फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. त्यांना एकत्र पाहून चाहत्यांनी ते दोघे एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असावेत, असे कयास बांधले होते. चाहत्यांचा हा कयास खरा ठरला आहे. दोघे एकत्र प्रोजेक्टसाठी शूटिंग करत आहेत. या दरम्यान त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता, या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर दोघांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे हे दोघे चर्चेत आले आहेत.

लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री किंझा हाश्मीने २०१४मध्ये 'अधुरा मिलन' मालिकेतून पडद्यावर पदार्पण केले आणि अनेक मालिकांमध्ये भूमिका केल्या. तिने २०१८मध्ये 'इश्क तमाशा'मध्ये ग्रे शेड भूमिका साकारली होती. त्य...