Mumbai, जानेवारी 28 -- Viral News: पावसाळ्यात वीज कोसळण्याच्या अनेक घटना घडतात, ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु, विमानावर वीज कोसळताना कधी तुम्ही पाहिलेत का? सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात विमानतळावर उभा असलेल्या विमानावर अचनाक वीज कोसळते.

ही घटना ब्राझीलमधील साओ पाउलो ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. इथे एक भयानक वादळ आले आणि मुसळधार पाऊस पडला. यादरम्यान, विमानतळावर उभ्या असलेल्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानावर वीज कोसळली. विमानावर वीज कोसळल्याची घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विमान विमानतळावर उभे आहे आणि मुसळधार पाऊस पडत आहे. त्यावेळी अचानक विमानाच्या मागील भागात वीज कोसळली. या घटनेत विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. विमानाची तपास...