प्रयागराज, फेब्रुवारी 3 -- Maha Kumbh 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभात स्थान करण्यासाठी आलेल्या एका दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यात एक संबंधित व्यक्ती आपल्या पत्नीला नटण्यास मदत करत आहे. आपल्या पत्नीसाठी त्याने एका हातात मेकअप पाउच आणि दुसऱ्या हातात आरसा पकडला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

सौंदर्या शुक्लाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक दाम्पत्य नदी किनाऱ्यावर गर्दीत उभे असल्याचे दिसत आहे. नवऱ्याच्या एका हातात आरसा आणि दुसऱ्या हातात मेकअप पाऊच आहे. तर, त्याची बायको मेकअप करत आहे. आजूबाजूला बरेच लोक आहेत, पण कशाचाही विचार न करता तो आपल्या पत्नीला नटण्यास मदत करत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकही खूप खूश झाले आहेत. ...