Mumbai, जानेवारी 27 -- Viral News: घरात गिझर बसवण्यासाठी आलेल्या व्यक्तीने त्यात छुपा कॅमेरा लावला आणि त्यातून मिळालेल्या खाजगी व्हिडिओद्वारे एका महिलेला ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, याप्रकरणात पोलिसांना भलताच संशय आला. त्यांनी महिलेची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. महिलेचे संबंधित व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. याबाबत महिलेच्या नवऱ्याला समजल्यानंतर तिने स्वतःला वाचवण्यासाठी संबंधित व्यक्तीवर खोटे आरोप केले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काहीजण एका दुचाकीस्वार व्यक्तीला अडवतात. या व्हिडिओत एक व्यक्ती असे सांगत आहे की, दुचाकीस्वारने आमच्या घरातील गिझरमध्ये छुपा कॅमेरा बसवून माझ्या पत्नीचे खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड केले. तसेच या व्हिडिओद्वारे तिला ब्लॅकमेल केले. हे ऐकताच आजूबाजुला जमलेले लोक...