Mumbai, जानेवारी 31 -- Viral News: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात जगभरातून लोक येत आहेत. भाविकांसह अनेक सेलिब्रिटी आणि एन्फ्लुएंसर देखील या महाकुंभात पोहोचले आहेत. महाकुंभात पोहोचलेले बहुतेक लोक आठवण म्हणून आपल्या मोबाईलमध्ये फोटो किंवा व्हिडिओ शूट करत आहे. परंतु, महाकुंभात एका तरुणीने चक्क स्नान करण्यासाठी जातानाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केल्याने नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओत संबंधित तरुणीने अंगावर फक्त टॉवेल गुंडाळल्याचे दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी महाकुंभात स्थानक करण्यासाठी जात आहे. यावेळी तिने फक्त अंगावर पांढऱ्या रंगाचा टॉवेल गुंडाळला आहे. घाटावर उपस्थित असलेले लोक या तरुणीला पाहून आश्चर्यचकीत होतात. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या तरुणीने स्वत:चा व्हि...