Mumbai, जानेवारी 28 -- China Zoo Sells Tiger Urine: प्राण्यांच्या प्रश्नांशी संबंधित वादांशी चीनचे सखोल संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर चीनमधील एक प्राणिसंग्रहालय सध्या खूप चर्चेत आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे. चीनमधील जागतिक दर्जाच्या प्राणिसंग्रहालयात वाघांच्या मूत्राचा व्यवसाय सुरू आहे. इतकेच नाही तर, संधिवात आणि इतर अनेक आजारांमध्येही याचा फायदा होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. ही बातमी समोर आल्यानंतर लोक संतप्त झाले आहेत. सोशल मीडियावर लोक या बेताल आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यावर संताप व्यक्त करत आहेत.

दक्षिण-पश्चिम चीनच्या सिचुआन प्रांतातील यान बिफेंगझिया वन्यजीव प्राणिसंग्रहालयाने दावा केला आहे की, प्राण्यांचे मूत्र आणि पांढरी वाइन मिसळल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, प्राणिसंग्रहा...