Buldhana, जानेवारी 31 -- Buldhana Viral News : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. गर्भवतीच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटातही बाळ वाढत असल्याचे सोनोग्राफीमध्ये स्पष्ट झालं आहे. या प्रकारामुळं डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसला आहे. ही घटना दुर्मिळ असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एक गर्भवती महिला ही सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. तिची सोनोग्राफी केल्यावर ही घटना उघकडीस आली.

बुलढाण्यातील शासकीय रुग्णालयात महिलेची अल्ट्रासोनोग्राफी करण्यात आली. यावेळी तिची सोनोग्राफी पाहून डॉक्टरांना मोठा धक्का बसला. महिलेच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या पोटात देखील आणखी एक बाळ वाढत असल्याचं डॉक्टरांना दिसलं. ही विलक्षण घटना पाहून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी पुन्हा तपास...