Delhi, जानेवारी 30 -- Viral News : 'पढ़ोगे लिखोगे तो बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे तो हो जाओगे खराब'! लहानपणीची ही म्हण तुम्ही तुमच्या मोठ्या व्यक्तिंकडून बरेचदा ऐकली असेल. जर अभ्यास केला तर तुम्ही मोठे व्हाल असा या म्हणीचा अर्थ आहे. मात्र, आता ही म्हण चुकीची ठरण्याची वेळ आली आहे. कारण, सोशल मीडियावर एका जॉबची जाहिरात व्हायरल झाली आहे. यात काम करण्यासाठी कोणत्याही प्रकरची पदवी, जुना अनुभव अशी कोणतीही माहिती मागितली नाही तर, अर्जदार हा एका ब्रेकअपमधून भेर पडलेला असावा अशी अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हे नेमकं काय प्रकरण आहे, याची माहिती घेऊयात.

निमिषा चंदा नावाच्या एका एक्स युजरने ही पोस्ट केली आहे. तिला एक ब्रेकअप झालेला प्रियकर हवा आहे. प्रोफाईलनुसार, निमिषा ही टॉपमेटमध्ये मार्केटिंग लीड आहे. तिनं केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, कंपनी अशा व...