दिल्ली, फेब्रुवारी 4 -- Viral News :सोशल मीडियावर दररोज काहीना काही व्हायरल होतं असतं. कधी लोकांचं मनोरंजन करणाऱ्या या गोष्टी असतात तर कधी लोकांना चिंतेत टाकणाऱ्या या व्हायरल गोष्टी असतात. चीनमध्ये देखील असेच एक प्रकरण व्हायरल झालं आहे. प्रेमी आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी विविध कल्पना लढवत असतात. मात्र, अशीच एक कल्पना प्रियकरांच्या अंगलट आली.

खरं तर एका चिनी व्यक्तीला आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज करायचं होतं. त्यासाठी त्याने सोन्याची अंगठी विकत घेतली. प्रेयसीला सरप्राईज देण्यासाठी त्याने ती अंगठी केकच्या आत लपवली. व त्यानंतर केक शिजवला. जेव्हा त्याने तो केक आपल्या प्रेयसीसमोर ठेवला तेव्हा त्याच्या प्रेयसीने अंगठीसह केक खाऊन टाकला.

चीनच्या सिचुआन प्रांतातील लियू या महिलेने सोशल मीडियावर तिच्या सोबत घडलेल्या या घटनेची माहिती ...