Delhi, फेब्रुवारी 6 -- Viral News : भारतात नवी कायदा संहिता तयार करण्यात आली आहे. यात विविध गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. दंड, तुरुंगावास ते कठोर शिक्षा म्हणून फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, अमेरिकेत कायदे वेगळे आहे. येथे एका व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याला तब्बल ४७५ वर्षांच्या कारावास ठोठावण्यात आला आहे. ही शिक्षा भोगण्यासाठी त्याला एक नाही तर अनेक जन्म देखील कमी पडणार आहे.

अमेरिकेतील जॉर्जियामधील एका आरोपीला ही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला अनेक जन्म घ्यावे लागणार आहेत. बेकायदा कुत्र्यांची झुंज लावणाऱ्या व त्यांना त्यासाठी प्रशिक्षित करणाऱ्या एका ५७ वर्षीय व्यक्तीला ४७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. व्हिन्सेंट लॅमार्क असे या व्यक्तीचे नाव...