Mumbai, नोव्हेंबर 13 -- Who Is Imsha Rehman: पाकिस्तानी टिकटॉक स्टार इमशा रेहमानने तिचे अश्लील व्हिडिओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर तिचे सोशल मीडिया अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट केले आहे. ही तरुण टिकटॉकर डेटा चोरीची शिकार झाली आहे, ज्यामुळे तिचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाले आहेत. स्थानिक रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअ‍ॅप, एक्स आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रेहमान एका मित्रासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसली होती. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली. यामुळे अखेर रेहमानने तिचे सोशल मीडिया अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट केले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पाकिस्तानी इन्फ्लुएंसरचे खासगी व्हिडिओ ऑनलाईन लीक झाले आहेत. याआधी टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक हिचेही खासगी व्हिड...