नई दिल्ली, जानेवारी 31 -- Viral News : स्पर्धेच्या या युगात अनेक कंपन्या आपल्या कुशल आणि चांगल्या कर्मचाऱ्यांना कंपनीत टिकून ठेवण्यासाठी विविध ऑफर्स व बोनस जाहीर करत असतात. अनेक कंपन्या बोनसमध्ये घरे, कार आणि भेटवस्तू देतात, तर काही कर्मचाऱ्यांना रोख रक्कम देतात. अशीच एक ऑफर सध्या चर्चेत असून तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ही कंपनी चीनची आहे. चीनमधील एका क्रेन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना रोख रक्कम गोळा करण्याची ऑफर दिली. याअंतर्गत कंपनीने ११ मिलियन डॉलर्सच्या (७० कोटी रुपये) नोटा टेबलवर ठेवल्या आणि आपल्या कर्मचाऱ्यांना जेवढी रक्कम मोजता येईल तेवढी उचलण्यास सांगितले. ही रक्कम तुमच्या वर्षभराचा बोनस असेल, पण त्यासाठी कर्मचाऱ्यांना फक्त १५ मिनिटे देण्यात आली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेनान मायनिंग क्रेन कंपनी लिमिटेडने आपल्या कर्मचाऱ्य...