Colambo, फेब्रुवारी 10 -- Viral News : भारताचे शेजारी राष्ट्र श्रीलंकेला पुन्हा एकदा विजेच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. गेल्यावेळी ऊर्जेच्या संकटामुळे लाइट गेली होती. मात्र, या वेळी संपूर्ण देशातील लाइट जाण्याचे कारण हे ऊर्जा संकट नाही तर काही तरी वेगळेच आहे. हे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. ही घटना व्हायरल झाली आहे. अनेक देशातील नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

श्रीलंकेत वीज गेल्याचे कारण हे ऊर्जा संकट नसून माकडं ठरली आहेत. श्रीलंकेच्या इलेक्ट्रिसिटी ग्रीड सबस्टेशनमध्ये रविवारी सकाळी ११.३० च्या सुमारास एक माकड घुसलंन. ज्यामुळे वीज गेली आणि संपूर्ण देशाचा वीजपुरवठा खंडित झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चार तास उलटूनही वीज सेवा पूर्णपणे पूर्ववत झालेली नव्हती.

ऊर्जामंत्री कुमारा जयकोडी यांनी पीटीआयला सांगितले की, दक्षिण कोल...