Delhi, जानेवारी 31 -- Blood Waterfall in Antarctica: गेल्या ५०० वर्षांत मानवाने पृथ्वीच्या प्रत्येक खंडावर आपला ठसा उमटवला आहे. पण अंटार्क्टिका खंड हा अजूनही माणसासाठी एक कोडचं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ असून या कित्येक मीटर बर्फाखाली नेमकं काय लपलं आहे हे शोधणं शास्त्रज्ञांना देखील कठीण बनलं आहे. आजही पृथ्वीवरील सर्वात गूढ ठिकाण म्हणून अंटार्क्टिकाचं नाव घेतलं जातं. या गोठलेल्या खंडावरील अनेक रहस्ये हळूहळू उलगडत आहेत. ज्यामुळे शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या खंडावरचे असेच एक रहस्य म्हणजे येथे वाहणारा एक धबधबा ज्याला रक्ताचा धबधबा असं म्हटलं जातं.

अंटार्क्टिकाच्या टेलर ग्लेशियरच्या खालून वेस्ट लेक बोनीमध्ये वाहणारा हा धबधबा त्याच्या लाल रंगामुळे चर्चेत आला आहे. सुमारे ११० वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन भूगर्भशास्त्रज्ञ ...