केरळ, फेब्रुवारी 4 -- kerala Viral News : देशभरात शालेली पोषण आहार मुलांना दिला जातो. मुलांचे वजन वाढावे व त्यांची प्रकृती ठीक राहावी या उद्देशाने अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील मुलांना हा पौष्टिक आहार दिला जातो. यात प्रामुख्याने खिचडी किंवा उपमा दिला जातो. मात्र, केरळमध्ये एका अंगणवाडीमध्ये असणाऱ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याला पोषण आहारात खिचडी आणि उपमा एवजी बिर्याणी आणि चिकन फ्राय हवे आहे. या व्हिडिओने केरळ सरकारचेही लक्ष वेधले आहे. मुलाचा व्हिडिओ पाहून त्यांनी अशा बालसंगोपन केंद्रांच्या मेन्यू किंवा डिशमध्ये बदल करण्याचे सुतोवाच केले आहे.

केरळ राज्याचे आरोग्य, महिला व बालकल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांनी सोमवारी आपल्या फेसबुक पेजवर शंकू नावाच्या एका मुलाचा व्हिडिओ शेअर केला. यानंतर त्यांनी अंगणवाडीत देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच...