Mumbai, फेब्रुवारी 11 -- Indian Currency: एका सोशल मीडिया वापरकर्त्याने त्याला आजोबाच्या काळातील ५०० रुपयांची जुनी नोट सापडल्याचा दावा केला आहे. या वक्तीने असाही दावा केला आहे की, ही नोट त्याच्या आजोबाने त्यांच्या सामनात लपवून ठेवली होती, जी ५० वर्ष जुनी आहे. संबंधित व्यक्तीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या नोटीची त्याला किंमतीपेक्षा जास्त पैसे मिळतील, अशी शक्यता व्यक्त केली.

संबंधित व्यक्तीने रेडिट केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'मला माझ्या वडिलांच्या जुन्या पेटीत १९७० च्या दशकातील ५०० रुपयांची जुनी नोट सापडली आहे. या नोटीचा एक भाग गायब झाला आहे. या नोटीचे मला किती रुपये मिळू शकतात, याची कोणाला काही कल्पना आहे का?' फोटोमधील नोट टेपने चिटकवलेली दिसत आहे.

या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. एक...