Mumbai, फेब्रुवारी 3 -- Delhi Groom Dance News: स्वत:च्या लग्नात बॉलिवूडमधील 'चोली के पीछे क्या है' या लोकप्रिय गाण्यावर डान्सवर करणे नवरदेवाच्या अंगलट आले. नवरदेवाने आपल्या मित्रासोबत केलेला डान्स वधूच्या वडिलांना आवडला नाही, त्यांना नवऱ्या मुलाबाबत भलताच संशय आला आणि त्यांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. या घटनेची सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे.

ही घटना १८ जानेवारी २०२५ रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भव्य मिरवणुकीसह स्वत:च्या लग्नात पोहोचलेल्या नवरदेवाला त्याच्या मित्रांनी त्यांच्यासोबत डान्स करण्याचा आग्रह केला. तितक्यात चोली की चोली के पीछे क्या है, हे गाणे वाजू लागले. नवरदेवालाही बॉलिवूडच्या प्रसिद्ध गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता आला नाही आणि तोही मित्रांसह डान्स करू लागला. लग्नात सामील झालेल्या पाहुण्यांनी या क्षणाचा आनंद ...