Mumbai, फेब्रुवारी 4 -- Agra Woman Seeks Divorce Over High Heels Sandals: पती-पत्नीमध्ये कोणत्या कारणांवरून वाद होईल, हे सांगता येऊ शकत नाही. आग्र्यामधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने हाय हील्स सँडल खरेदी न केल्याने संतापलेल्या एका महिलेने थेट घटस्फोटाचा निर्णय घेतला. या दाम्पत्यांना कुटुंब समुपदेशन केंद्रात पाठवण्यात आले. मात्र, या प्रकरणाने अनेकांना धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जोडप्याचे गेल्या वर्षी लग्न झाले. महिलेला हाय हील्स सँडल घालण्याची आवड आहे. त्यामुळे लग्नानंतर तिने आपल्या पतीकडे हाय हील्स सँडलची मागणी केली. पण पतीने तिला नकार दिला. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. पतीला वाटले की, काही काळानंतर त्याची पत्नी हाय हील्स सँडलचा हट्ट सोडून देईल. परंतु हे प्रकरण वाढत गेले आणि भांडणापर्...