Hyderabad, एप्रिल 25 -- Hyderabad Wedding Card Goes Viral: सोशल मीडियावर व्हायरल झालेली लग्नपत्रिका पाहून पोलिसांनी नवरदेवाविरुद्ध गुन्ह दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या लग्नपत्रिकेत नेमके असे काय छापण्यात आले? हे पाहिल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली, हे जाणून घेण्यासाठी अनेकांना उस्तुकता लागली आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली लग्नपत्रिका तेलंगणा राज्यातील असल्याचे बोलले जात आहे. या लग्नपत्रिकेत दिलेल्या माहितीनुसार, सुरेश नाईक असे नवरदेवाचे नाव आहे. तो मेडक जिल्ह्यातील मोहम्मद नगर गेट ठांडा येथील रहिवाशी आहे. सुरेशने आपल्या लग्नपत्रिकेत लोकसभा निवडणुकीला उभ्या असलेले उमेदवार घुनंदन राव यांचा फोटो छापला. तसेच लग्नाची भेट म्हणून आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्याने पाहुण्यांना केले....