Mumbai, फेब्रुवारी 10 -- Paneer and Milk Controversy: एका भारतीय डॉक्टरने दूध आणि पनीरला मांसाहारी पदार्थ म्हटल्याने सोशल मीडियावर दोन गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आहे. दूध आणि पनीर प्राण्यांकडून मिळतात आणि म्हणूनच त्यांना शाकाहारी पदार्थ म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही, असे डॉ. सिल्व्हिया करपागम यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. मात्र, या पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. डॉक्टरांच्या या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

डॉ. सिल्व्हिया करपागम यांनी जेवणाच्या थाळीच्या फोटोवर कमेंट केली . या फोटीतील थाळीमध्ये पनीर, मूगडाळ, गाजर, काकडी आणि कांद्यापासून बनवलेले कोशिंबीर, कच्चे नारळ, अक्रोड आणि गोड पदार्थांशिवाय खीरची वाटी यांचा समावेश होता. त्यावेळी डॉ. सिल्व्हिया यांनी दूध आणि पनीर शाकाहारी नसल्याचे म्हटले आहे...