Mumbai, जानेवारी 26 -- Bengaluru School Viral News: खाजगी अवाजवी फी आकारली जात असल्याच्या अनेक बातम्या ऐकायला मिळतात. अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, जी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. बंगळुरू येथील एका खाजगी शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची फी पाहिल्यानंतर पालकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशा अवाजवी फीमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

व्हॉइस ऑफ पॅरेंट्स असोसिएशनने ट्विटरवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये इयत्ता तिसरीची फी चक्क दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचा उल्लेख केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, बंगळुरूत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची फी २.१ लाख रुपये इतकी आहे. कोणत्याही प्रकारची महागाई या शुल्काचे समर्थन करू शकत नाही. सरकार अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या शुल्कावर नियं...