Delhi, फेब्रुवारी 2 -- Viral News : स्त्री-पुरुष संबंधातून मुले जन्माला येतात. पण, दोन पुरुष एकत्र येऊन मुलाला जन्म देऊ शकतात का? आईशिवाय बाळाला जन्म देणे शक्य आहे का? हा प्रश्न अनेकदा उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे हे शक्य असल्याचा दावा करत असले तरी आता पर्यंत हा प्रयोग यशस्वी झालेला नाही. मात्र, चीनमध्ये एका ऐतिहासिक प्रयोगामुळे हे शक्य असल्याचा दावा केला जात आहे. या प्रयोगात चीनी शास्त्रज्ञांनी दोन नर प्रजनन करण्यास सक्षम असल्याचं सिद्ध केलं आहेय. हा प्रयोग उंदरांवर करण्यात आला आहे. हा प्रयोग इतका का महत्त्वाचा का आहे जाणून घेऊयात.

चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे (सीएएस) मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट शी कुन ली यांच्या नेतृत्वाखालील चिनी संशोधकांच्या चमूने स्टेम सेल इंजिनीअरिंगचा वापर करून हा प्रयोग यशस्वी केला आहे. जैव...