Delhi, जानेवारी 30 -- Viral News : पश्चिम बंगालमधील एका सरकारी विद्यापीठातील वर्गात वधूच्या वेशात जात एका विद्यार्थ्याशी एका महिला प्राध्यापकाने 'लग्न' केलं. दोघांच्या या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने बुधवारी चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मात्र, आम्ही लग्न केलं नसून नाटक होतं. तसेच त्यांच्या विषयासंबंधी अभ्यासाचा भाग असल्याचा दावा देखील या प्राध्यापिकेने केला आहे.

हे प्रकरण पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील हरिनघाटा येथील मौलाना अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातील आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत वधूच्या वेशात प्राध्यापिका आणि प्रथम वर्षात शिक्षण घेणार विद्यार्थी वर्गात 'सिंदूर दान' आणि 'माला बादल' (पुष्पहार) यासह व...